जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेलीच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर एकूण निकाल 98 टक्के
गोवेली:-कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक प्रिय,अग्रगण्य अशा जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेली येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२६ च्या इयत्ता बारावीच्या (एच.एस.सी.) परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. विज्ञान शखेचा निकाल 100 टक्के तर एकूण महाविद्यालयाचा निकाल 98 टक्के लागला आहे. यावर्षी महाविद्यालयातून सर्वाधिक ६८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून महाविद्यालयाचा एकूण ९८.६८ % निकाल लागला आहे. महाविद्यालयाचे शाखेनुसार विशेष प्राविण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
विज्ञान शाखा १०० %
प्रथम - सानिका जयवंत भरणुके - 88 %, टक्के,
द्वितीय - कु. सुमित संदिप बांगर- ८२.८३ %,
तृतीय - कु. तनिष्का संदीप लोणे - ७८.५० %,
चतुर्थ - कु. प्रज्ज्वल प्रशांत जाधव - ७८.१७ %,
चतुर्थ : राज राहूल तोंडलिकर - ७८.१७
वाणिज्य शाखा ९९.०० %
प्रथम - कु. प्रांजली राजाराम जाधव - 86 %,
द्वितीय - कु. हर्ष़दा संजय केणे - ८४.५० %,
तृतीय - कु. भूमिका विश्वास शिसवे - ८१.८३ %,
चतुर्थ - कु. श्रेयस शिवराज मयेकर - ८१.६७ %,
पंचम - कु. जस्मिन विनय कटारिया - ८१.०० %
कला शाखा 96 %
प्रथम - सायली सुनील झाटे - 83 टक्के
द्वितीय - तनुजा भालचंद्र भेरले - ८१.५० %,
तृतीय - धनश्री सुनील भोईर - ८०.५० %,
चतुर्थ - पूर्वा रामनाथ भोजणे - ७६.५० %,
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.रविंद्र घोडविंदे सर,संचालिका स्मिता घोडविंदे,संचालक प्रशांत घोडविंदे,प्राचार्य रोहणे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मयोगी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात करीअर करता येईल,अशा जीवनदीप महाविद्यालय गोवेली,खर्डी,म्हसा येथे सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपले व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करावे,असे आवाहन घोडविंदे सर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.