• Total Visitor ( 571552 )
News photo

पत्रकार कारंडे हे संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व; पत्रकार प्रा. प्रविण जगताप 

Raju tapal December 02, 2025 120

पत्रकार कारंडे हे संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व; पत्रकार प्रा. प्रविण जगताप 

   

शिरूर:- पत्रकार कारंडे हे संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते अशी प्रतिक्रिया दैनिक लोकमत चे तळेगाव ढमढेरे येथील पत्रकार,श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयातील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रविण बबनराव जगताप यांनी पत्रकार दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. दैनिक लोकमत वृत्तपत्राचे न्हावरे ता‌.शिरूर येथील पत्रकार डाॅ‌.दत्तात्रय मारूती कारंडे यांचे सोमवार दि.१ डिसेंबर २०२५ ला अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी टिटवाळा न्यूज ने सोमवार दि.१ डिसेंबरला त्वरित प्रसिद्ध केली. दैनिक लोकमतचे पत्रकार,प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दैनिक लोकमतचे तळेगाव ढमढेरे येथील पत्रकार,श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयातील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रविण बबनराव जगताप म्हणाले, दैनिक लोकमतचे पत्रकार प्रा.दत्ता कारंडे हे संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व होते.त्यांच्या निधनाची वार्ता कानावर येताच क्षणभर विश्वासच बसत नव्हता.त्यांच्या निधनामुळे न्हावरे‌ गाव परिसरातील पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे.पत्रकार बंधूंच्या वतीने मी पत्रकार कारंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. दैनिक पुढारी वर्तमानपत्राचे तळेगाव ढमढेरे येथील पत्रकार ,न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जून विद्यालयातील आदर्श शिक्षक प्रा.एन बी मुल्ला प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले,पत्रकार प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे हे दैनिक लोकमत मधील नि:पक्ष,निर्भिड पत्रकार होते.मराठी भाषेचे गाढे अभ्यासक तसेच आमचे सहकारी मित्र होते.त्यांना माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. दैनिक लोकमत वर्तमानपत्राचे मांडवगण फराटा येथील पत्रकार दत्तात्रय पोपट कदम तसेच शिक्रापूर येथील पत्रकार शेरखान शेख यांनीही पत्रकार प्रा.दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, दैनिक लोकनेता चे आळंदी येथील पत्रकार गौतम पाटोळे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले,पत्रकार श्री.दत्तात्रय कारंडे यांचा स्वभाव शांत,मनमिळाऊ होता.पत्रकार कारंडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या कुटूंबियांना दु:ख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement