कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत शासनाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन मोठया उत्साहात संपन्न !
क्रीडा व युवक सेवा,महाराष्ट्र राज्य, पुणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा 2025-26 चे आयोजन दि. 06 ऑक्टोबर ते दिनांक 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये डॉन बॉस्को स्कूल आधारवाडी कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या कबड्डी स्पर्धेमध्ये 14,17, व 19 या वयोगटातील, एकूण 407 संघात एकूण 4800 ते 5000 मुले व मुली यांनी सहभाग नोंदवला . सदरील स्पर्धा ह्या मागील वर्षी प्रमाणे मॅट वर खेळविण्यात आल्या , कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कबड्डी या स्पर्धा संघटनेच्या अधिकृत पंचांच्या माध्यमातून घेण्यात आल्या.
14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये पाटील बालमंदिर मराठी प्रथम क्रमांक, डॉन बॉस्को हायस्कूल कल्याण द्वितीय क्रमांक, स्वामी विवेकानंद दत्तनगर तृतीय क्रमांक मिळवला, मुलींच्या 14 वर्षे वयोगटात स्वामी विवेकानंद दत्तनगर प्रथम क्रमांक, डॉन बॉस्को हायस्कूल कल्याण द्वितीय क्रमांक, रिता मेमोरियल यांनी तृतीय क्रमांक मिळवला, 17 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक के.वी. पेंढारकर कॉलेज डोंबिवली, द्वितीय क्रमांक डॉन बॉस्को हायस्कूल कल्याण, तृतीय क्रमांक कॅप्टन रवींद्र स्कूल कल्याण, यांनी पटकावला तर मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रगती कॉलेज डोंबिवली, द्वितीय क्रमांक विद्यामंदिर मांडा टिटवाळा, तृतीय क्रमांक आनंद ग्लोबल स्कूल कल्याण यांनी मिळवला. 19 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत बीके बिर्ला कॉलेज कल्याण प्रथम क्रमांक, के. एम. अग्रवाल कॉलेज द्वितीय क्रमांक, बी. आर. मढवी कॉलेज तृतीय क्रमांक यांनी मिळवला व मुलींच्या स्पर्धेत प्रगती कॉलेज डोंबिवली प्रथम क्रमांक, के.वी. पेंढारकर कॉलेज द्वितीय क्रमांक ,अचिवर्स हायस्कूल यांनी तृतीय क्रमांक मिळवला, सर्व विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच पंच, मदतनीस व खेळ प्रमुख यांचे मानधन स्पर्धेच्या ठिकाणीच देण्यात आले.
सदर समयी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे,( क्रीडा विभाग ) डॉन बॉस्को स्कूल चे ट्रस्टी जॉन सर, खेळप्रमुख रेणुका पीसे, सुरज जाधव,आकाश गायकवाड, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अनिल शेजवळ सर क्रीडा समिती सदस्य कृष्णा बनगर, विजय सिंग, कृष्णा माळी, संतोष पाटील ( क्रीडा विभाग ), तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.