कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न !
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ६४ व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सन २०२५-२६ सब ज्युनिअर, ज्युनिअर मुले व मुलींच्या स्पर्धेचे आयोजन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन महापालिकेचे क्रीडा विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एकुण ६० संघ सहभागी झाले होते. १५ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अंतिम सामना लोढा वर्ल्ड स्कूल पलावा व बी के बिर्ला स्कूल यांच्यामध्ये रंगतदार झाला. सदर स्पर्धेमध्ये लोढा वर्ल्ड स्कूल पलावा या शाळेचा संघ विजयी झाला तर उपविजयी बी के बिर्ला स्कूल कल्याण आणि तिसरा क्रमांक ब्रायटन वर्ल्ड स्कूल यांनी पटकावला.
तसेच 17 वयोगटातील मुलांचा अंतिम सामना बीके बिर्ला स्कूल व स्वामी विवेकानंद स्कूल यांच्यामध्ये रंगतदार झाला. सदर सामन्यामध्ये बी के बिर्ला स्कूलचा संघ अंतिम विजयी ठरला. द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद स्कूल यांनी तर तृतीय क्रमांक ओंकार इंटरनॅशनल स्कूल यांनी पटकावला. 17 वर्षीय मुलींच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना लोढा वर्ल्ड स्कूल पलावा व सेंट लॉरेन्स स्कूल यांच्यामध्ये झाला यामध्ये अंतिम विजयी संघ लोढा पलावा स्कूल द्वितीय क्रमांक सेंट लॉरेन्स व तृतीय क्रमांक बी के बिर्ला स्कूल यांनी पटकावला आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दिनांक 10 जुलै 2025 रोजी क्रिडा विभागाचे उपायुक्त संजय जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, खेळ प्रमुख डॉ.विजयसिंह, बी के बिर्ला कॉलेजचे स्पोर्ट्स डायरेक्टर यज्ञेश्वर बागराव, कृष्णा माळी तसेच फुटबॉलपटू सॅमसंग यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारोह संपन्न झाला.
क्रीडा विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे प्रथमतः सर्व विजयी संघांचा खेळ संपल्याच्या दिवशी ट्रॉफी व मेडल देऊन गुण गौरव करण्यात आला. सर्व पंच व रेफ्री तसेच मदतनीस यांना स्पर्धेच्या अंतिम दिवशी मैदानावर नियोजित मानधन रोखीने अदा करण्यात आले. स्पर्धेच्या उत्तम नियोजन व आयोजनामुळे सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू, पंच पालक यांनी समाधान व्यक्त करून क्रीडा विभागाचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे निवेदन बीके बिर्ला कॉलेजचे ठाकरे यांनी केले.