• Total Visitor ( 516396 )
News photo

कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पःउड्डाणपुलासाठी आधुनिक "UHPFRC' तंत्रज्ञानाचा वापर !

Raju Tapal publisher May 05, 2026 63

कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पःउड्डाणपुलासाठी आधुनिक "UHPFRC' तंत्रज्ञानाचा वापर !



स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरशन लिमिटेड (SKDCL) अंतर्गत सुरू असलेल्या 'कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा" प्रकल्पाने आता आधनिकतेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पातील नियोजित "फ्लाय ओव्हर- A- सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौक़" - लांबी ११२५ मी. x रुंदी सरासरी (१८ ते ९ मी.) या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात आहे. सदर उ्डाणपुलाच्या Span AP14-ACP1 आणि ACPI-ACP2 या ठिकाणी बांधकामासाठी मलेशिया 'देशाच्या 'अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्ड फोर्ड काँक्रीट (UHPFRC) या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून,प्रस्तुत  कामास IIT,मुंबई यांनी कामाचे Structural Design (Proof Checking) चा आधार उपलब्ध करून दिल्याने उड्डाणपुूलाचे काम अंतिम टप्यात आहे. कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक ( प्रवेशद्वार क्र. 0१) येथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पुल (FOB) प्रस्तुत उड्डाणपुलाचे कामात निष्कासित करावा लागणार होता. परंतु स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त असल्याने,सदर FOB निष्कासित करणे योग्य नव्हते.,त्यामुळे कल्याण स्टेशन समोरील परिसरात UHPFRC या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काल मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग करण्यात आले,यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी,आयुक्त अभिनव गोयल,शहर अभियंता अनिता परदेशी,कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंत्राटदार उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महानगरपलिकेने  UHPFRC या जागतिक तंत्रज्ञानाचा  वापर केला असून,कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. UHPFRC हे पारंपारिक काँक्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबत आणि लवचिक असते. हे सिमेंट,सिलिका फ्युम,विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचे मिश्रण करून तयार केले जाते,हे तंत्रज्ञान काँक्रीटला स्टीलसारखी मजबुती प्रदान करते. याची संकुचन शक्ती (compressive strength)साध्या काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पटीने जास्त असते.हे काँक्रीट अत्यंत दाट असल्याने हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही,ज्यामुळे पुलाचे आयुष्य १०० वषपिक्षा जास्त वाढते. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते,ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अधिक सुरक्षा मिळते.याला तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असल्याने भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे . मुंबई-पुणे एक्सप्रेस 'मिसिंग लिंक प्रकल्पात UHPFRC या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement