गोव्यात पार पडलेल्या त्रिकोणी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र अंध क्रिकेट संघाला उपविजेतेपद
गोवा - कोरो ग्राउंड, मार्सेल गोवा येथे 13 व 14 जानेवारी दरम्यान आयोजित त्रिकोणी अंध क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या तीन संघांदरम्यान झालेल्या या शृंखलेत गोवा संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.
महाराष्ट्र संघाच्या कामगिरीचा आढावा
महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत गोवा संघासमोर 163 धावांचं सगळं आव्हान ठेवलं होतं परंतु गोवा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांनी हे आव्हान केवळ 15 धावातच पूर्ण करीत विजय संपादन केला.
साईनाथ गजलेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने अप्रतिम कामगिरी केली. संघाचा उपकर्णधार अनिल एटी यांनी देखील आपली भूमिका चोख बजावली. प्रवीण करलुके यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत "मॅन ऑफ द सिरीज"चा किताब पटकावला.
याशिवाय, महाराष्ट्र संघाचा गोलंदाज राहुल महाले याने उत्कृष्ट गोलंदाजी करत स्पर्धेतील "उत्कृष्ट गोलंदाज" हा मानाचा पुरस्कार जिंकला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन आणि सर्व आयोजकांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेमुळे अंध क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळाले असून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
महाराष्ट्र अंध संघाच्या सर्व खेळाडूंनी माजी नगरसेवक दया शेट्टी आणि माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात अशी स्पर्धा भरवण्याची विनंती केली या विनंतीला प्रतिसाद देत शेट्टी यांनी लवकरच ही स्पर्धा महाराष्ट्रात भरविण्यात सहकार्य करण्यात येईल असे माजी नगरसेवक दया शेट्टी आणि माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले
सर्व विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन नागरिक करीत आहेत.