माळशेज घाटात रस्त्याचे कामे सुरू असल्याने अनेक वाहने नादुरुस्त
मुरबाड ते माळशेज घाट या मुख्य रस्त्यांचे काम चालू असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहे. टोकावडे पासून माळशेज घाट रस्त्यांचे काम जोमाने सुरू केले असून ठेकेदार यांनी रस्ता दोन्ही बाजूला खोदून ठेवलेले असल्याने नगर पुणे माळशेज घाट मार्ग जाणाऱ्या छोट्या मोठ्या चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालले असून याला जबाबदार कोण असा पश्र पडला आहे. आता दिवाळी सण जवळ आला तरीही टोकावडे नाक्यावरील रस्ता पूर्ण होत नाही यंदा टोकावडे बाजार पेठ मध्ये रस्ता मुळ दिवाळी सणात शुकशुकाट पसरली असून रस्त्यावरील गरीबांच्या टपरी उठवल्यानंतर टोकावडे बाजार पेठ ओस पडली आहे. तरी बाजारपेठ मधील रस्ता त्वरित करून घ्या अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.
राजेश भांगे- मुरबाड