• Total Visitor ( 516422 )
News photo

शेंडी आरोग्य केंद्रातील औषध खरेदी व पुरवठा घोटाळा – “मोठ्या मास्यांपर्यंत तपास जाणार का?”

Raju Tapal publisher April 15, 2026 62

शेंडी आरोग्य केंद्रातील औषध खरेदी व पुरवठा घोटाळा – “मोठ्या मास्यांपर्यंत तपास जाणार का?”



सुरेशराव नवले 

शेतकरी नेता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 



शेंडी आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असताना औषध सप्लायरचा चार्ज असलेल्या मंदार श्रावना पावडे याच्यावर औषध पुरवठ्यातून तब्बल दोन ते तीन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप असून तो सध्या राजुर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची मुळं फक्त एका कर्मचाऱ्यापर्यंत मर्यादित नसून शेंडीपासून लोनीच्या पाटलांच्या वाड्यापर्यंत मोठं नेटवर्क असल्याची चर्चा जनतेतून जोर धरत आहे. शेंडी आरोग्य केंद्रात झालेल्या कथित करोडो रुपयांच्या गैरव्यवहारामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांना वेळेवर औषधं न मिळाल्याने उपचाराअभावी आणि सर्पदंशासारख्या घटनांमध्ये जीव गमवावा लागल्याच्या वेदनादायी तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण औषध खरेदी व पुरवठा प्रक्रियेची सखोल,निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तत्कालीन जिल्हा परीषद अध्यक्ष कोण होते?शेंडी गावातील आरोग्य कर्मचारी म्हणुन शेंडी गावातील स्थानिक प्रशासन काय करत होते ?यांचे काही कनेक्षन आहे का? पालकमंत्री साहेबांनी या प्रकरणाची गांभीर्यानेने दखल घेऊन “मोठ्या माशांपर्यंत” तपास पोहोचवावा,हीच जनतेची मागणी आहे. अन्यथा भव्य एल्गार केला जाणार।


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement