• Total Visitor ( 385197 )
News photo

जिल्हा परिषद शाळा शेंदूरजना बाजार येथे मिशन IAS सामान्य ज्ञान स्पर्धा -2026 चे आयोजन

Raju tapal January 10, 2026 23

जिल्हा परिषद शाळा शेंदूरजना बाजार येथे मिशन IAS सामान्य ज्ञान स्पर्धा -2026 चे आयोजन



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक उपक्रम  2025-26 अंतर्गत मिशन IAS- सामान्य ज्ञान स्पर्धा -2026 चे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना बाजार येथे दि. 9 जानेवारी 2026 रोजी आयोजन करण्यातआले.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासून स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. सदर परीक्षेला इयत्ता 5 वी ते 7 वी मधील एकूण 56 विदयार्थी सहभागी झाले. सदर परीक्षा करीता केंद्र संचालक म्हणून वंदना विंचुरकर मॅडम होत्या. पर्यवेक्षक म्हणून सदर शाळेतील सहाय्यक शिक्षक दिनेश भलावी,सुजाता ब्राह्मणे आणि गुलाबराव मुंदाने होते. केंद्र निरीक्षक म्हणून आकाशभाऊ आसोडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी कार्यभार सांभाळला. या उपक्रमाला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाले. सदर उपक्रमाचे आयोजन कृष्णा चिचमलकर (विज्ञान विषय शिक्षक) जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना बाजार यांनी केले.ते 20 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकरीता हा उपक्रम राबवित आहे. हा अत्यंत स्तुत्य व स्पर्धेच्या काळात उपयुक्त असा उपक्रम आहे. हा उपक्रम सदर शाळेत 16 ऑगस्ट 2025 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान (गाव ते जग )याविषयी संपूर्ण माहिती तसेच नवोदय व स्कॉलरशिप परीक्षा,सामान्य ज्ञान,चालू घडामोडी यावर आधारित संपूर्ण मार्गदर्शन व सराव देण्यात आला. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जयप्रकाश नेमाडे,विषय शिक्षक राजेंद्र ठाकरे,सहाय्यक शिक्षक दिनेश भलावी,गुलाबराव मुंदाने,वंदना विंचुरकर,सुजाता ब्राह्मणे तसेच मोहिनी चौधरी यांनी सहकार्य केले. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी संपन्न होणार आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement