• Total Visitor ( 695458 )
News photo

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक 

Raju Tapal publisher August 31, 2026 58

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक 



शहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा 



केंद्रीय समितीच्या खासदारांसह खासदार नरेश म्हस्के यांचे विजय थलपती यांनी विधानसभेत केले स्वागत 



ठाणे:- वेगाने वाढणाऱ्या महानगरांसमोर निर्माण होणाऱ्या वाहतूक,पाणीपुरवठा,गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शहरांच्या विकास मॉडेलचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक चेन्नई येथे पार पडली. समितीचे सदस्य तथा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी समितीतील खासदारांसह तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची भेट घेतली. चेन्नई हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक असून,वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांवर विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. वाहतूक व्यवस्था,मेट्रोचा विस्तार,पाणीपुरवठा,सांडपाणी व्यवस्थापन,गृहनिर्माण आणि शहराचा नियोजित विस्तार या विषयांचा समितीने यावेळी अभ्यास केला. बैठकीदरम्यान तामिळनाडू सरकार,चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी,चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड,चेन्नई महानगरपालिका,चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्ड तसेच गृहनिर्माण आणि नगरविकासाशी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समितीचे स्वागत केले. संबंधित विभागांच्या वतीने सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरणही करण्यात आले. शहराचा सुनियोजित विस्तार,आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,मेट्रोचे जाळे, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा,सांडपाणी व्यवस्थापन आणि गृहनिर्माण प्रकल्प याबाबत समितीने सविस्तर माहिती घेतली. भविष्यातील लोकसंख्या आणि शहराच्या गरजा लक्षात घेऊन शहरी नियोजन कशा पद्धतीने केले जाते,याचाही अभ्यास करण्यात आला. चेन्नईसारख्या मोठ्या शहरासमोरील आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञान,योग्य नियोजन आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले असे  खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. 



 *ठाण्याच्या विकासासाठी अनुभवाचा फायदा* 



ठाण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठीही वाहतूक,पाणी,गृहनिर्माण,मेट्रो आणि पायाभूत सुविधांचे नियोजन ही महत्त्वाची आव्हाने आहेत. त्यामुळे चेन्नईतील यशस्वी प्रकल्प आणि त्यांच्या अंमलबजावणीची पद्धत ठाण्यासह देशातील इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते. “देशातील विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या यशस्वी प्रकल्पांचा अभ्यास केल्यामुळे आपल्या शहरांच्या विकासासाठी नवीन कल्पना,आधुनिक उपाययोजना आणि प्रभावी नियोजन आत्मसात करण्याची संधी मिळते. चेन्नईच्या शहरी विकासाचा अभ्यास आणि या बैठकीत सहभागी होता आले,याचा आनंद आहे,” असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026