• Total Visitor ( 487741 )
News photo

सौ.चांदणी सागर शिंदे पॅनल क्रमांक ४ मधून निवडणूक लढविणार 

Raju tapal December 01, 2025 376

सौ.चांदणी सागर शिंदे पॅनल क्रमांक ४ मधून निवडणूक लढविणार 



राजू टपाल. 

बल्याणी :- केडीएमसीच्या पॅनल क्रमांक ४ मधून उंभरणी गावाच्या रहिवाशी तसेच युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.चांदणी सागर शिंदे या महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणातून निवडणूक लढविणार आहेत.सौ.चांदणी सागर शिंदे या उच्चशिक्षित व सक्षम उमेदवार म्हणून पॅनल क्रमांक ४ मधून युवासेना यांच्या मध्यमातुन प्रबळ दावेदार म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत. युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांनी स्थानिक माजी नगरसेविका सौ.नमिता मयुर पाटील व माजी नगरसेवक श्री.मयूर सुरेश पाटील विधानसभा संघटक यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन आपल्या प्रभागात अनेक विकास काम केलेली आहेत. त्यामुळे सागर शिंदे यांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.कल्याण लोकसभाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवा सेना हि केवळ बाईक रॅली पुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा सेनेचे महत्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे नियोजन पद्धतीने कामाला लागा असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. सौ.चांदणी सागर शिंदे यांनी युवा लढणार इतिहास घडणार,निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा या ब्रिद वाक्याच्या अवलंब करून आपली पुढची तयारी जोरात सुरु केलेली आहे. त्यामुळे पॅनल क्रमांक ४ मधील निवडणूक हि मोठी चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement