• Total Visitor ( 385178 )
News photo

खडवली जवळील जुगाव येथे बहुउद्देशीय केंद्र सुरु सरपंच गीता गजानन कडव यांच्या हस्ते उद्घाटन

Raju tapal December 02, 2025 76

खडवली जवळील जुगाव येथे बहुउद्देशीय केंद्र सुरु



 बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच दिपाली शेलार यांच्या सततच्या पाठपुराव्याने व मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेवक समीर शेलार यांच्या सहकार्याने जुगाव येथे बेहरे खडवली ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री जनमत योजना अंतर्गत बहुउद्देशीय केंद्र समाज मंदिर बांधण्यात आले आहे. केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता गजानन कडव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यासमयी उपसरपंच चतुरा गायकवाड,सदस्य  नरेश कथोरे,दिपाली शेलार,जगन कडव,ग्रामविकास अधिकारी बी.बी.पष्टे,माजी उपसरपंच दत्ता जाधव,समाज सेवक अशोक रातांबे,समाजसेवक समीर शेलार यांच्या सह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बहुउद्देशीय केंद्रा मध्ये अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र,इतर वर्ग,आदि सुविधा उपलब्ध असणार आहेत. बहुउद्देशीय केंद्राचा लाभ परिसरातील नागरिकांना तसेच महिला बचत गटांना होणार आहे. समाजसेवक समीर शेलार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. बहुउद्देशीय केंद्र होण्यासाठी तत्कालीन सरपंच दिपाली शेलार यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या कालावधीत मंजूर झाले होते. समाजसेवक अशोक रातांबे यांनी सांगितले की बहुउद्देशीय केंद्राचा उपयोग जनतेच्या कामांसाठी झाला पाहिजे असे सांगितले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement