• Total Visitor ( 695535 )
News photo

डोंबिवली पूर्व येथील फ प्रभागातील हॉटेल जिम्मी व्हेज रेस्टो लॉऊंजवर महापालिकेची कारवाई!  

Raju Tapal publisher August 16, 2026 33

डोंबिवली पूर्व येथील फ प्रभागातील हॉटेल जिम्मी व्हेज रेस्टो लॉऊंजवर महापालिकेची कारवाई!

 

डोंबिवली पूर्व फ प्रभाग क्षेत्र परिसरातील बाजीप्रभू चौकात असलेले हॉटेल जिम्मी वेज रेस्टो लाऊंजवर आज फ़ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी त्यांच्या अतिक्रमण पथकामार्फत कारवाई केली. 



गोल्डन प्लाझा या इमारतीच्या आठव्या  मजल्यावर जिम्मी व्हेज रेस्टो बार होते. बारमालक महेंद्र गांधी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पणे व्यवसाय करीत असल्याची तक्रार फ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे प्राप्त होताच त्यांनी याप्रकरणी बार मालकाला आवश्यक त्या कागदपत्रांसह सुनावणी करिता बोलावले. सुनावणीमध्ये संबंधित बार मालकाने टेरेस शेडला नगररचना विभागाची परवानगी तसेच अग्निशमन विभागाची परवानगी घेतलेली दिसून आली नाही. त्यामुळे सहा.आयुक्त प्रसाद  ठाकूर यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदरचे शेड अनधिकृत ठरवून ते गांधी यांना काढून घेण्याबाबत फर्मावले.दोन नोटीसा देऊन देखील महेंद्र गांधी यांनी स्वतःहून वेदर शेड न काढल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी आज आवश्यक पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथक प्रमुख राजू शेलार,नरेश भोईर,ह प्रभागाचे सहा.आयुक्त अभिमन पवार यांच्या साह्याने शेड निष्कासनाची कारवाई केली. याप्रकरणी स्थानिक पालिका सदस्य रंजना पेणकर यांनी देखील तक्रार दाखल केली होती.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026