स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या अकरा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS)शिष्यवृत्ती
शिरूर:- शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेला एकूण ७६ मुले प्रविष्ट झाली होती.७६ पैकी ५२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून अकरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
1) मोरे नैतिक किरण 140 गुण
2) जैतकर करण प्रवीण 134 गुण
3) कोळी नव्या योगेश 112 गुण
4) निर्मळ श्वेताली विश्वास 147 गुण
5) खुरपे सिद्धी गणेश 127 गुण
6) जठार निवेदन श्रीकांत 115 गुण
7) जगताप ज्ञानदा परमेश्वर 123 गुण
8) गायकवाड आराध्या शैलेश 113 गुण
9) शेलार प्रांजल नंदकुमार 125 गुण
10) वाघमारे प्रतीक्षा महेश 111 गुण
11) सूर्यवंशी कृष्णा बालाजी 142 गुण
या विद्यार्थ्यांना रविंद्र गणपत सातपुते,अलका सुरेंद्र सातपुते,सोनाली सचिन शेळके,सरला सुरेश ढमढेरे,नितीन श्रीहरी माने यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्राचार्य अशोकराव दहिफळे,उपप्राचार्या सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.