• Total Visitor ( 636535 )
News photo

अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते सन्मान!

Raju Tapal publisher June 05, 2026 52

अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते सन्मान!



अहिल्यानगर :- जिल्ह्यातील वृत्तपत्रांना अनेक वर्षांपासून शासकीय बातमीपत्रे उपलब्ध करून देत पत्रकारिता क्षेत्राला मोलाचे सहकार्य करणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयास आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पत्रकार आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी माहिती कार्यालयाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी मित्रांचा साईबाबांची प्रतिमा,घड्याळ,शाल,पुष्पगुच्छ,हरीपाठ,पेन व की-चेन देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील विविध शासकीय योजना, उपक्रम व विकासकामांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने सातत्याने केलेल्या कार्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे वातावरण आपुलकीचे व उत्साहपूर्ण होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement