शाळा व शिक्षणाच्या अस्तित्वासाठी, शिक्षकांच्या अस्मितेच्या जोपासणेसाठी अमरावती जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती च्या वतीने
सरकारी मराठी शाळा टिकविण्यासाठी, गरीबांच्या मुलांचे शिक्षण वाचविण्यासाठी TET लागू करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी,१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेबाबतचा जी.आर. रद्द करण्यासाठी, जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी
शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर सकाळी११:०० वाजता स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे..
सन्मा. शिक्षक बंधू-भगिनींना,सस्नेह नमस्कार,
"वादळ घोंघावतय नोकरीवर,आता तरी उतरा रस्त्यावर"
शिक्षकांवर एकामागून एक ओळीने लादल्या जाणारी ऑनलाईन कामे,अव्यवहार्य व अवास्तव उपक्रम,आधार वैधतेच्या नावावर जाणीवपूर्वक प्राथमिक शाळांची पटसंख्या रोडावण्याचे षडयंत्र,डोईवर सदैव लादल्या जाणारा अशैक्षणिक कामाचा डोंगर,आणि या सर्व बाबीमुळेही न खचलेल्या शिक्षकांना हादरविण्याचे कटकारस्थान म्हणजे शिक्षकांवर लादल्या जाणारी TET (शिक्षक पात्रता परिक्षा) ची सक्ती आणि त्या माध्यमातून शिक्षकांची नोकरी हिरावून घेण्याचे शासनाचे महाषडयंत्र. षडयंत्र हाणून पाडायचे असेल तर उभारावी लागेल एकजुटीची महाशक्ती,पुकारावा लागला एल्गार व शासनाच्या दुष्ट इराद्यांना द्यावी लागेल धडक आणि म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन चला तर मग सहभागी होऊया..
ऊठ शिक्षका जागा हो,संघर्षाचा धागा हो.