महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत अस्थिव्यंग दिव्यांग विदयार्थ्यांच्या प्राथमिक तपासणीचे आयोजन !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातंर्गत अस्थिव्यंग/दिव्यांग विदयार्थ्यांसाठी ऑर्थापेडिक कॅम्पचे आयोजन दि.07/01/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे. तरी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा,महाविदयालय यांचे मुख्याध्यापक शिक्षक/विशेष शिक्षक,पालक यांनी आपापल्या संपर्कातील, शाळांमधील,शाळाबाहय अस्थिव्यंग व बहुविकलांग असलेल्या दिव्यांग विदयार्थ्यांना त्यांची तपासणी करुन प्रमाणपत्रे व युटीआयडी कार्ड काढण्यासाठी 7 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात हजर राहणेबाबत कळवावे. तसेच अधिक माहितीसाठी समग्र शिक्षण विभागाचे समन्वयक घोडे सर यांच्याशी 9423757280/8655590880 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.