पडघा पोलिस ठाणे येथील पोलिस शिपाई योगेश वाघेरे यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान
राजू टपाल.
भिवंडी:- महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निष्ठेने,प्रामाणिकपणे व उल्लेखनीय कार्य करणारे पडघा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई योगेश बाळकृष्ण वाघेरे यांना त्यांच्या उत्कृष्ट व निष्कलंक सेवेसाठी भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्या वतीने ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. पोलीस दलातील कर्तव्य बजावताना त्यांनी दाखविलेली कार्यतत्परता,शिस्त,प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय सेवा यांची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठेच्या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पडघा पोलीस ठाणे तसेच संपूर्ण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यांच्या या यशाबद्दल ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे,पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी तसेच सर्व पोलीस अधिकारी, सहकारी पोलीस अंमलदार यांनी कौतुक करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.