ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याकडून पोटॅश खत निर्मिती
शिक्रापूर:- ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी लक्ष्मीनगर ,जातेगाव बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याकडून पोटॅश खत निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे. कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे,सन २०२५-२०२६ चे गळीत हंगामातील आपल्या कारखान्याने पोटॅश पावडर खत निर्मिती सुरू केलेली असून सदर खतामध्ये फाॅस्फेट,आॅरगॅनिक कार्बन,मॅग्नेशियम,पोटॅशियम, झिंक,सल्फेट इ.घटक असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी सदर खत उपयोगी असून सदर खत कारखाना कार्यक्षेत्रातील ज्या शेतक-यांचा ऊस सन २०२५-२६ चे गळीत हंगामात गाळपासाठी आलेला असेल त्या शेतक-यांना उधारी तत्वावर देण्यात येईल.सदर खताची होणारी रक्कम उसाच्या बिलातून कपात करण्यात येईल.खताचा विक्री दर प्रती गोणी रूपये ३०/- याप्रमाणे राहील.तरी ऊस उत्पादक शेतक-यांनी आपली मागणी आपले संबंधित शेतकरी गट आॅफीसला नोंदवावी .सदर खत कारखाना साईटवरून घेवून जावे असे कारखान्याचे चेअरमन संदीप तौर,जनरल मॅनेजर के.एस.दोरगे,क्रेन मॅनेजर पी.बी.वामन साहेब यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे