• Total Visitor ( 636513 )

पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे गतिमान कामकाज

Raju Tapal publisher June 06, 2026 53

पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे गतिमान कामकाज

      

शिक्षक -शिक्षकेतर प्रतिनिधींच्या  वतीने शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर यांचा सन्मान 

       

शिरूर:- पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे आयोजित शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात आयोजित शिबीरादरम्यान पुणे याठिकाणी सर्व शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या प्रतिनिधींनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.डॉ.भाऊसाहेब कारेकर  यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागात श्री.कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार सुरू असल्याबद्दल त्यांचा सर्व संघटनांच्या वतीने सामूहिक सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे कोषाध्यक्ष महेश शेलार,कार्याध्यक्षसंजीव मांढरे,पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद,पुणे जिल्हा कोषाध्यक्ष भाऊसाहेब खोसे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड,सचिव शिवाजीराव कामथे,कार्याध्यक्ष राजेश गायकवाड,नाना शिवले,पुणे शहर ज्युनियर कॉलेज टी.डी.एफचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे,शिक्षक परिषद मावळचे कार्यवाह देवराम पारिठे व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील अडीच वर्षात पारदर्शी पद्धतीने झालेली समायोजन प्रक्रिया,झिरो पेंडन्सी,त्रुटी विरहित नियमित मान्यतांना तात्काळ मंजुरी,पेन्शन प्रस्तावांना विनाविलंब मान्यता,अनुकंपा मान्यता,ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या वैद्यकीय बिलांचा तालुकानिहाय निपटारा,गतिमान पद्धतीने संचमान्यता पत्रकांचे वाटप,टप्पा अनुदान पत्रांचे तात्काळ वाटप,सर्वत्र कौतुकास पात्र असणारा गुणवत्ता संवर्धन अभियान उपक्रम,तालुकानिहाय मुख्याध्यापक कार्यशाळांचे आयोजन करून समुपदेशन या व यासारख्या अनेक स्तुत्य उपक्रमांबद्दल कारेकर यांचे कौतुक करण्यात आले.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement