• Total Visitor ( 670347 )
News photo

गोवेलीमध्ये रेड रन मॅरेथॉन उत्साहात संपन्न; २१ महाविद्यालयांचे २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी

Raju tapal July 26, 2025 162

गोवेलीमध्ये रेड रन मॅरेथॉन उत्साहात संपन्न; २१ महाविद्यालयांचे २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी



टिटवाळा (प्रतिनिधी) :- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त गोवेली येथील जीवनदीप शिक्षण संस्था संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन झाले.



कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे आणि ग्रामीण रुग्णालय, गोवेलीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपलक्ष्मी मेश्राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.



स्पर्धेत २१ महाविद्यालयांतील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. मुला-मुलींसाठी स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी केवळ धावण्याची स्पर्धा न करता आरोग्य, शिस्त व सामाजिक भान यांचे उत्तम उदाहरण सादर केले.



विजेतेपद पटकावणारे विद्यार्थी:



मुलांचा गट



हरिओम सिंग – S.S.T. College



विशाल कनोजिया – S.S.T. College



हरिओम मौर्य – B.K. Birla College (Night)



मुलींचा गट



सुजाता मुंडेकर – S.S.T. College, उल्हासनगर



अंकिता डी. पळ – S.S.T. College, उल्हासनगर



धनश्री व्ही. पडवळ – V.P.M. College, किनवली



या कार्यक्रमाच्या यशस्वितेमागे महाविद्यालयाचे प्रशासन, प्राध्यापकवर्ग, स्वयंसेवक आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, ठाणे यांचे मोलाचे योगदान लाभले. रुक्मिणीबाई हॉस्पिटल, कल्याण येथील आयसीटीसीचे कृष्णा कुमावत यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.



या उपक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा नव्हे, तर HIV/AIDS विषयी जनजागृती, आरोग्यविषयक साक्षरता आणि युवकांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणे हा होता.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement