दिल्ली विमानतळावर अभिजीत दीपकेसह तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती !
जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी जात असल्याचा दावा; विमानात वाद झाल्याचीही चर्चा
नवी दिल्ली :- अभिजीत दीपके,सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. हे तिघे जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी जात होते, असेही या दाव्यात म्हटले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे कर्मचारी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेण्यासाठी विमानात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी विमानात वाद झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान,अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांनाही दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. जंतर-मंतर येथे परवानगीशिवाय आंदोलन करण्याच्या उद्देशाने ते दिल्लीला जात असल्याचे या दाव्यात नमूद करण्यात आले आहे.
मात्र,या घटनेबाबत दिल्ली पोलिसांचे अधिकृत निवेदन, ताब्यात घेण्याचे नेमके कारण आणि पुढील कायदेशीर कारवाई याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकरणातील अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.