• Total Visitor ( 670259 )
News photo

येत्या केडीएमसी निवडणुकीत मांडा टिटवाळा मधील आरपीआय निर्णायक भूमिका घेणार- शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांचे प्रतिपादन

Raju tapal December 01, 2025 141

येत्या केडीएमसी निवडणुकीत मांडा टिटवाळा मधील आरपीआय निर्णायक भूमिका घेणार- शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांचे प्रतिपादन....

गेल्या दहा वर्षांपासून भाजपा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची आघाडी असताना देखील स्थानिक मांडा टिटवाळा भाजपने आरपीआय ला नेहमीच दुय्यम भूमिकेत ठेवलेले आहे. आज पर्यंत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आरपीआय ला कुठेही विचारात घेतलेले नाही किंवा एकाही बॅनर वर कोणत्याच पदाधिकाऱ्यांचे फोटो किंवा नाव लावलेले नाहीत. त्यामुळे येथील आंबेडकरी समाज हा सर्वस्वी मनापासून नाराज असून येत्या केडीएमसी निवडणुकीत भाजपा ला कोणत्याही स्वरूपात सहकार्य करणार नसल्याची भूमिका आरपीआय मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या केडीएमसी निवडणुकीत भाजपाला याचे जबर फटका बसण्याची दाट शक्यता आहे..त्यातच 2015 च्या निवडणुकीतवॉर्ड क्रमांक 8 मधून आरपीआयचे विजय भोईर यांच्या सुविज्ञ पत्नी उषाताई भोईर यांना तिकीट जाहीर केले होते व वॉर्ड क्रमांक 9 व 10 मध्ये आरपीआयने कोणताही उमेदवार देऊ नये असे ठरलेले असताना ही भाजपने ऐनवेळी दुसरा उमेदवार उभा करून गद्दारी केली होती याची सल ही आरपीआय च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये असल्याने या निवडणुकीत भाजपाला मदत करायचीच नाही असा पवित्रा आंबेडकरी समाजाने घेतलेला आहे. अशी भूमिका आरपीआय शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांनी घेतलेली आहे.*

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement