अतिशय अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून ओळख असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार"पदी" निवड होत असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी भेट घेऊन केले अभिनंदन...
सिंधुदुर्ग:-भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते मा.प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार"पदी" निवड होत आहे.या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. मा.प्रमोद जठार यांच्या होत असलेल्या निवडीमुळे कोकणाला अजून एक नवीन आमदार मिळत आहे. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.तसेच प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नेतृत्व आहे.अतिशय अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून प्रमोद जठार यांना ओळखले जाते. कॉलेज जीवनापासून त्यांनी भाजपचे काम केले.कोकणात भाजपचा आक्रमकपणे विस्तार करण्यात जठार यांचा सिंहाचा वाटा आहे.२००९ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रविंद्र फाटक यांचा अवघ्या ३२ मतांनी पराभव करत प्रमोद जठार कणकवलीतून विधानसभेत पोहोचले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नीतेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जठार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळत संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली.आता विधानपरिषदेत त्यांच्या रूपाने कोकणाला पुन्हा एक प्रतिनिधित्व मिळणार असून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.