शेतीपंपाचे वीजबील भरूनही कोंढापुरी ता.शिरूर येथील शेतक-याच्या वीजपंपाचा विद्यूतपुरवठा खंडीत
शेतीपंपाचे वीजबील भरूनही शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतक-याच्या विद्यूतपुरवठा ७- ८ दिवसांनतरही खंडीत आहे.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील थकबाकीदार शेतक-यांनी शेतीपंपाची वीजबिले भरली नाहीत म्हणून शेतक-यांच्या शेतीपंपांचे वीजकनेक्शन शिक्रापूर येथील महावितरणने आठवडापूर्वी पूर्णपणे खंडीत केला. शेतीपंपाचे वीजबील भरण्याविषयी लाईनमन लक्ष्मण खरसडे यांनी संबंधित शेतक-यांना तोंडी पूर्वसुचना दिल्या.
कोंढापुरी येथील पाझर तलावावरील ऑक्सिकूल कंपनीजवळ असलेल्या विद्यूतरोहित्रातून होणारा शेतक-यांच्या शेतीपंपाचाही वीजपुरवठा वीजबिले भरली नसल्याच्या कारणावरून, थकबाकी असल्याच्या कारणावरून महावितरणने आठवडाभरापूर्वी पूर्णपणे खंडीत केला.
लाईनमन लक्ष्मण खरसडे यांच्या तोंडी सुचनेवरून कोंढापुरी ता.शिरूर येथील शेतकरी श्री.विजय संभाजीराव ढमढेरे यांनी त्यांना आलेले शेतीपंपाचे बील २९ हजार २५० रूपये रांजणगाव गणपती येथील संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत दि.२९/११/२०२१ रोजी एकरकमी भरले. वीजबील भरल्यानंतर शेतीपंपाचे वीजबील भरल्याची पावती लाईनमन लक्ष्मण खरसडे तसेच महावितरणचे तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे यांच्या व्हाट्स अँप नंबरवर पाठवून शेतीपंपाचे वीजबील भरल्याचे फोन करून सांगितले.
आज सोमवार दि.६ /१२/२०२१ रोजी शेतीपंपाचे वीजकनेक्शन चालू करण्याविषयी शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांनी लाईनमन लक्ष्मण खरसडे यांना फोन करून विचारले असता कनेक्शन असलेल्या विद्यूतरोहित्रावरील ७ - ८ शेतक-यांकडे थकबाकी आहे. थकबाकी असलेल्या इतर शेतक-यांनी ,शेतीपंपाचे वीजबील न भरलेल्या शेतक-यांनी त्यांचे थकबाकीचे वीजबील भरल्यानंतरच तुमच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लाईनमन खरसडे यांनी सांगितले. तसेच महावितरणचे असिस्टंट इंजिनिअर श्री.पाटील यांचा मोबाईल नंबर देवून त्यांच्याशी याबाबत संपर्क करण्याविषयी सांगितले. महावितरणचे असिस्टंट इंजिनिअर श्री .पाटील यांच्याशी शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांनी संपर्क केल्यानंतर अजून ब-याच शेतक-यांकडे थकबाकी आहे. इतर शेतक-यांनी थकबाकी भरल्यानंतर विद्यूतपंपाचे कनेक्शन चालू करण्यात येईल . तुमचे कनेक्शन चालू केल्यानंतर इतर थकबाकीदार शेतक-यांचाही विद्यूतपुरवठा चालु होईल असे सांगितले.
एखाद्या थकबाकीदार शेतक-याला गरज नसल्यास , एखाद्या शेतक-याने थकबाकी आणखी वर्षभराने भरल्यास वीजबील ,थकबाकी तातडीने भरलेल्या , भरूनही गरज असलेल्या शेतक-यांच्या शेतातील पिकांचे काय होणार असा प्रश्न शेतकरी विजय ढमढेरे यांनी उपस्थित केला. ज्या शेतक-यांनी विद्यूतपंपाची थकबाकी, वीजबील भरले आहे त्यांच्या विद्यूतपंपाचा वीजपुरवठा पुर्ववत, सुरळीत चालू करण्याची मागणीही शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांनी टिटवाळा न्यूजशी बोलताना केली.