किल्ले निवती येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ला ऐतिहासिक वास्तू म्हणून विकसित व्हावा यासाठी शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी घेतली आमदार किरण सामंत यांची भेट..
किल्ले निवती येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ला ऐतिहासिक वास्तू म्हणून विकसित झाली तर निसर्ग रम्य असलेल्या भोगवे गावाच्या पर्यटनात अधिक भर पडणार..
सिंधुदुर्ग :- वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे या पर्यटन गावातील किल्ले निवती येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ला ऐतिहासिक वास्तू म्हणून विकसित व्हावी या दृष्टीने शिवसेना आमदार सन्माननीय किरण सामंत यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग सचिन देसाई यांनी नुकतीच भेट घेतली व सदर किल्ला पर्यटन दृष्ट्या विकसित होण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
दरम्यान आमदार किरण सामंत यांनी यासंदर्भात येथे आठ दिवसांत योग्य तो प्रस्ताव सादर करून यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांना दिले आहे.
तसेच सदरचा किल्ला जर विकसित झाला तर भव्य गावासह वेंगुर्ला तालुका सुद्धा पर्यटन दृष्ट्या अधिक विकसित होणार आहे. त्यामुळे सदरच्या किल्ला हा विकसित होण्याचा मुद्दा भोगवे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच रुपेश मुंडये यांनी या अगोदर प्रस्ताव दिले होते तसेच आता देखील त्यांनी नवीन प्रस्ताव तातडीने आमदार किरणजी सामंत यांच्याकडे देऊन सदरचा किल्ला लवकरात लवकर विकसित व्हावा व भोगवे गावाच्या पर्यटनात अधिक भर पडावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.