• Total Visitor ( 670244 )
News photo

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक....अरविंददादा ढमढेरे यांचा महायुती शेतकरी विकास पॅनेल तसेच अपक्ष उमेदवार संजय पाचंगे‌ यांना पाठिंबा

Raju Tapal publisher July 01, 2026 168

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक....अरविंददादा ढमढेरे यांचा महायुती शेतकरी विकास पॅनेल तसेच अपक्ष उमेदवार संजय पाचंगे‌ यांना पाठिंबा



पुणे :-शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी (सन  २०२६ ) मतदान रविवार दि‌.५ जुलै २०२६ रोजी होत असून या निवडणुकीत मतदारांनी महायुती शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांना तसेच अपक्ष उमेदवार संजय पाचंगे यांना मतदान करावे असे आवाहन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती,महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे माजी सदस्य अरविंददादा साहेबराव ढमढेरे यांनी केले आहे. यासंदर्भात पाठिंबा दर्शविणा-या पत्रात अरविंददादा ढमढेरे यांनी म्हटले आहे,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील सर्वात महत्वाचा व लक्षवेधी मुद्दा म्हणजे घोडगंगा साखर कारखाना बंद पाडणा-या स्वार्थी व भ्रष्टाचारी माजी आमदार पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलला पर्याय म्हणून शेतकरी विकास पॅनेल तर आहेच. मात्र यासोबतच सर्वार्थाने,सर्व दृष्टीने एक अतिशय योग्य अपक्ष उमेदवार म्हणजे संजय पाचंगे असून त्यांना सर्वाधिक प्राधान्य देवून निवडून देणे उचित ठरेल. कारण शिरूर तालुक्यातील विविध संस्था व संघटनांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने तीव्रपणे लढा देणारे अत्यंत निर्भिड,जाणकार,विश्वासपात्र व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून संजय पाचंगे‌ यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे २० हजार सभासद व तालुक्यातील दीड लाख शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने विचार करून आपण सर्वांनी संजय पाचंगे‌ व महायुती शेतकरी विकास पॅनेल यांना मतदान करावे हीच एक अपेक्षा व नम्र विनंती असे पाठिंबा दर्शविलेल्या पत्रात अरविंददादा ढमढेरे यांनी म्हटले असून सदर निवडणुकीत आपल्याला लक्ष्मी दर्शन होवू शकते. ते घ्यावे मात्र मतदान विवेक बुद्धीने करावे असे आवाहनही अरविंददादा ढमढेरे यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement