• Total Visitor ( 722958 )
News photo

मरीन ड्राईव्हच्या कोस्टल रोडवर भरधाव कारचालकांचा धुमाकूळ;६ ते ७ चालकांवर गुन्हा दाखल

Raju Tapal publisher September 07, 2026 45

मरीन ड्राईव्हच्या कोस्टल रोडवर भरधाव कारचालकांचा धुमाकूळ;६ ते ७ चालकांवर गुन्हा दाखल

अतिवेगाने वाहने चालवून स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका;वाहनांची ओळख पटली,ताब्यात घेण्याची कारवाई सुरू



राजू टपाल.

मुंबई :- मरीन ड्राईव्ह परिसरातील कोस्टल रोडच्या साउथ बॉंडवर अतिवेगाने आणि वाहतूक शिस्तीचे उल्लंघन करत मोटार कार चालविणाऱ्या ६ ते ७ अज्ञात चालकांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारचालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता कोस्टल रोड साउथ बॉंड, मरीन ड्राईव्ह येथे पिवळ्या,लाल तसेच इतर रंगांच्या सहा ते सात मोटार कार अतिवेगाने चालविल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या वाहनचालकांनी कोणतीही वाहतूक शिस्त न पाळता वाहनांचा वेग वाढविल्याने अपघाताचा तसेच जीवितहानीचा धोका निर्माण झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश निवृत्ती सांगळे (वय ४२),नेमणूक मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे,यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.५५ वाजता गुन्हा रजि. क्र. ३४१/२०२६ नोंद करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून,संबंधित सहा ते सात वाहनांची ओळख पोलिसांनी निष्पन्न केल्याची माहिती आहे. संबंधित वाहने ताब्यात घेऊन चालकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement