• Total Visitor ( 765553 )
News photo

सारंगपुरी ग्रामपंचायतीत स्टेट बँकेतर्फे आर्थिक समावेशन व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

Raju tapal August 15, 2025 106

सारंगपुरी ग्रामपंचायतीत स्टेट बँकेतर्फे आर्थिक समावेशन व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर



शहापूर :- भारतीय स्टेट बँक, शहापूर शाखेतर्फे दुपारी 3 वाजता सारंगपुरी ग्रामपंचायत येथे आर्थिक समावेशन शिबिर व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.



या शिबिरास भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (CGM) संदीप कुमार, भारतीय स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक (DGM)  सुरजित त्रिपाठी, DGM – FI दया शंकर, RM कल्याण क्षेत्र राजेश कुमार, शहापूर शाखा प्रमुख श्वेता सावंत, तसेच सारंगपुरी ग्रामपंचायत सरपंच नारायण दरोडा, उपसरपंच किशोर ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.



शिबिरात बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजना जसे निष्क्रिय खाते सुरु करणे, जुन्या खात्यांची KYC अद्ययावत करणे, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश लाडे यांनी केले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शाखा प्रमुख श्वेता सावंत यांनी आभार मानत शिबिराचा समारोप केला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement