• Total Visitor ( 722948 )
News photo

सुभाष चंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय बहुळ यास माजी विद्यार्थी यांच्याकडून कंपाऊंड भिंतीसाठी लाख मोलाची मदत 

Raju Tapal publisher September 07, 2026 326

सुभाष चंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय बहुळ यास माजी विद्यार्थी यांच्याकडून कंपाऊंड भिंतीसाठी लाख मोलाची मदत 



गौतम पाटोळे 



फुलगाव:- स्पर्धेच्या संगणकीय युगात दातृत्व कर्तुत्व व नेतृत्व ज्यांनी या आदर्श गुणांचा अभ्यास करून उपयोग केला. त्यांनी जीवनात खऱ्या अर्थाने गगन भरारी घेतली असे प्रतिपादन बहुळ गाव चे आदर्श सुपुत्र व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक ग्रेड अंकुश वाडेकर यांनी बहुळ येथे व्यक्त केले.

बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे येथील सुभाष चंद्र विद्यालय येथील कंपाउंड भिंतीचे बांधकाम सुरू असल्याने सदर बांधकामास हातभार लावण्यासाठी शाळेतील 1986 87 या वर्षी शालेय शिक्षण घेतलेल्या माजी सुज्ञ व आदर्श विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र विद्यालयाच्या कंपाउंड भिंतीसाठी 16001 रुपये चा निधी महाविद्यालयाचे प्राचार्य व सदर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी 1986 87 चे विद्यार्थी सध्याचे प्राचार्य बाळासाहेब आरेकर यांच्याकडे सुपूर्त केली याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर माजी चेअरमन नाना खलाटे विजय डोमाळे भानुदास वाडेकर महाराज पांडुरंग वाडेकर व पुणे जिल्हा न्यायालयाचे सरकारी पोलिस प्रोसीक्यूटर मारुती वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उत्कृष्ट कार्याचे बोल ग्रामस्थ माजी विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले व यातून प्रेरणा घेऊन बहुळ गावातील सर्व माजी विद्यार्थी यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यान्वये वेळोवेळी आपल्या शाळेला महाविद्यालयाला गावात योग्य ते योगदान देण्याचे आश्वासन दिले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement