स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेचे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश
शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
कु श्वेताली विश्वास निर्मळ 300 पैकी 276 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 10 वी आली असून
जिल्हा गुणवत्ता यादीत
समृद्धी ज्ञानेश्वर भुजबळ 264/300
नैतिक किरण मोरे 244/300
श्रावणी सचिन शेळके 230/300
सिद्धी गणेश खुरपे 226/300
निवेदन श्रीकांत जठार 220/300 गुण मिळवून हे पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना रविंद्र सातपुते,अलका सातपुते,नंदा सातपुते, सरला ढमढेरे,विजय राऊत,सोनाली शेळके,मनिषा शिंगोटे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहनराव ओमासे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक केले.