• Total Visitor ( 636506 )
News photo

सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर सुखरूप परतणार

Raju tapal March 17, 2025 296

सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर सुखरूप परतणार;

नासा व स्पेसएक्सचे अंतराळ यान पोहचले अंतराळ स्थानकात 



न्यूयाँर्क :- भारतीय वंशाच्या नासाच्या अंतारळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. मात्र आता त्यांच्याबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुनिता आणि बुच या दोघांचीही पावलं लवकरचं जमिनीवर पडणार आहेत. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोरला घरी परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने त्यांचे अंतराळ यान पाठवले आहे.



शुक्रवारी नासा आणि स्पेसएक्सने एक महत्त्वपूर्ण क्रू मिशन लॉन्च केले. या मिशनद्वारे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणले जाणार आहे. त्यामुळे काहीच दिवसात ते पृथ्वीवर वापसी करतील. त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फॉल्कन 9 रॉकेटने शुक्रवारी संध्याकाळी 7:03 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले. क्रू ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटच्या वर बसवण्यात आली होती, त्यामध्ये चार सदस्यांची टीम घेऊन जाण्यात आली. 19 मार्चपर्यंत सुनिता आणि बुच हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



डॉकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर अंतराळवीर ISS मध्ये पोहचतील. याठिकाणी त्यांची सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट होईल. त्यानंतर या सर्वांना घेऊन अंतराळवीर त्यांना ड्रॅगन कॅप्सूलमध्ये आणतील. त्यानंतर स्पेस स्टेशनपासून त्यांची अनडॉकिंग होईल. त्यानंतर पृथ्वीकडे त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. ही सर्व मंडळी ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवर परत येतील. या सर्व प्रक्रियेला जवळपास 4 दिवस लागतील. येत्या 19 मार्चपर्यंत सुनिता विलियम्स आणि बूच विल्मोर पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.



ड्रॅगन कॅप्सूलच्या सेफ लँडिंगसाठी एक फूल प्रुफ प्लॅनिंग करण्यात आली आहे. त्यानुसार, ही कॅप्सूल मॅक्सिकोच्या आखातात उतरवण्यात येणार आहे. पॅराशूटच्या मदतीने ही कॅप्सूल उतरवण्यात येईल. त्यानंतर रिकव्हरी टीम कॅप्सूलला बाहेर काढले. त्यानंतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणण्यात येईल. सुनिता आणि बूब हे गेल्या 287 दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. त्यामुळे ही कॅप्सूल दोघांसाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसेल.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement