लेखक आनंद पारगावकर लिखित ‘कोकरोच’ पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे व 50 पेक्षा जास्त पुस्तक लिहून प्रकाशित करणारे लेखक आनंद पारगावकर यांचे एक नवीन आणि तरुणांत जोश निर्माण करणारे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. साहित्य क्षेत्रात ‘आनंद:’ नावाने नवीन साहित्य निर्माण करून स्वतःची ओळख इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलेली आहे. तसेच आपल्या लेखणीतून,कसा वापरायचा माहितीचा अधिकार?,कसा उघडा पाडायचा भ्रष्टाचार?,इमारतीचा घोळ उघडकीस आणण्याचा फॉर्मुला,हाऊ टू ओपन बिल्डिंग कन्सट्रक्शन स्केम?,माणसे ओळखायला शिका,पुस्तक प्रकाशित करण्याचा मार्ग इत्यादी अनेक पुस्तके लिहून जनतेत जनजागृती केली असून ही पुस्तकं मोठ्या प्रमाणात गजलेली पुस्तके आहेत. ज्याची विक्री सुद्धा अफाट झाली आहे. सध्या नव्याने हिंदी भाषेत प्रकाशित होणारे पुस्तक ‘कोकरोच’ हे कोकरोच या विषयाशी समंधित असल्याने आणि देशभरात कोकरोच वर होत असलेली चर्चा आणि कोक्रोच जनता पार्टी कडे वळला जाणारा तरुण वर्ग,सोशल मीडिया वर कोकरोचचे वाढले जाणारे करोडो फॉलोवर,कोकरोचचा अल्पवाधित वाढलेला प्रभाव व त्यांचे हितचिंतक,समर्थक/विरोधक आणि कोकरोच काय करू शकते? या व इत्यादी अनेक विषयावर हे विशेष पुस्तक प्रकाशित होणार आहे. सदर पुस्तक पारगावकर पब्लिकेशन मार्फत प्रसिद्ध होत असल्याने यांस इंडियन स्टॅंडर्ड बुक नंबर (ISBN) सुद्धा प्राप्त झाला आहे. सदर पुस्तक स्वतंत्र दिनानिमित्त दिल्ली येथे 15ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्याचा मानस लेखकाचा असून लवकरच ते तरुण पिडीला मार्गदर्शनपर ठरेलं आणि त्यांच्यात बदलाव होईल आणि देशासाठी कार्य करने बाबत एक जोश निर्माण होईल असेही लेखकाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.