• Total Visitor ( 695523 )
News photo

ज्याला शास्त्र मान्य आहे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर,सुसंगत आहे; ह.भ.प.सोनाली दिदी करपे

Raju Tapal publisher September 02, 2026 59

ज्याला शास्त्र मान्य आहे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर,सुसंगत आहे; ह.भ.प.सोनाली दिदी करपे



ज्याला शास्त्र मान्य आहे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर,सुसंगत आहे.ज्याच्या जीवनामध्ये शास्त्राला थारा नाही त्याच्या जीवनामध्ये गु़ंतागुंत दिसल्याशिवाय राहातं नाही असे प्रतिपादन गेवराई येथील श्री.क्षेत्र कल्याणस्वामी संस्थानच्या संस्थापक अध्यक्षा,ह.भ.प. सोनाली दिदी‌ करपे यांनी कोंढापुरी येथे केले. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थ अनिल शामराव गायकवाड यांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात आयोजित केलेल्या किर्तनात किर्तन सांगताना. ह.भ.प.सोनाली दिदी करपे बोलत होत्या. ह.भ.प.सोपानराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरिनाम सोहळ्यातील किर्तन ऐकण्यासाठी कोंढापुरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ,महिलांसह लहान मुले  उपस्थित होते. अशोक मारूती‌ दरवडे‌,मुरलीधर शंकर दरवडे‌ या ग्रामस्थांनी कै‌.मारूती‌ रामभाऊ दरवडे‌ कै‌.शंकर रामभाऊ दरवडे यांच्या स्मरणार्थ किर्तनास उपस्थित असलेल्या भाविकांची जेवणाची व्यवस्था केली. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता.खोटं पचविण्यासाठी सुद्धा साक्षीदारांची गरज असते.खोटं बोलणा-याला कुठच जागा नसते ती माणसं माणसातून उठून जातात असे सांगून किर्तनकार ह.भ.प.सोनाली दिदी करपे किर्तनात पुढे बोलताना म्हणाल्या,सत्यनारायणाची पुजा वारंवार करणा-याला समाधान,प्रतिष्ठा प्राप्त होत असते.ब-याच लोकांना बरोबरी करण्याची सवय असते.संतांचे आपल्यावर खूप उपकार आहेत.ज्याला लहान होता येतं तोच जगाच्या पाठीवर मोठा आहे,महान आहे.लक्ष ८४ चा‌ फेरा‌ चुकविण्यासाठी अध्यात्माचा मानवदेह हे खुप मोठे साधन,हा खुप मोठा मार्ग प्राप्त झालेला आहे.चुकून सुद्धा देवाचे नाव ज्याच्या तोंडात येत नाही अशांच्याही उद्धाराची तळमळ फक्त संतांच्या अंतःकरणात असते. महादेवाला लोटाभर पाणी घातलं की पितृदोष,वास्तूदोष,कालसर्प दोष असे कितीतरी दोष नाहीसे होतात. महादेवाला एक बेलाचे पान वाहिले की तीन जन्माची पापं जातात. हे श्लोक,कथा मी घरी तयार केलेल्या नाहीत या कथा पुराणात,ग्रंथात लिहिलेल्या आहेत.त्या तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचे काम मी करत आहे असे ह.भ.प.सोनालीदिदी करपे यांनी किर्तनात सांगितले. सगळं आहे पण समाधान नाही.पैशाने सुख मिळेल पण विचार मिळण्याचे काम ग्रंथ आणि संत करतील दुसरे कोणी करणार नाही. ज्या त्या वेळेला प्रसंगावधानाने माणसाने बोलावे.श्राद्धाचे किर्तन असेल तर श्राद्धाची माहिती सांगावी.बारशाचे किर्तन असेल तर बारशाची माहिती सांगावी.गणपती उत्सव असेल तर श्री गणेशाची माहिती सांगावी. ज्याची माणुसकी जीवंत आहे,जागी आहे तोच माणूस.माणसाची माणुसकी जीवंत ठेवण्याचे काम संत आणि संतांचे विचार करतात. ब-याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो गावात मंदीरांची गरज काय ? मंदीरात सप्ताह करण्याची गरज काय? किर्तनकारांना एवढे पैसे खर्च करण्याची गरज काय ? लोकवर्गणी करण्याची गरज काय ? हे अध्यात्म,ही उपासना,हे किर्तन,हा सप्ताह हे जर आपल्या जीवनात नसेल तर आपल्याला दिशा कोण दाखविणार ?असा सवाल ह.भ.प.सोनाली दीदी करपे यांनी उपस्थित श्रोत्यांना किर्तनात केला. तुमच्या प्रयत्नाने,कष्टाने प्रारब्धात मिळालेले जे धन आहे त्या धनाचा वापर कसा करावा याचे ज्ञान देण्याचे काम संत करतात.पैशामध्ये, वस्तूंमध्ये सुख नसते.त्याच्यात समाधान नसते. माणसाच्या विचारा़ंंमध्ये,चा़ंगुलपणामध्ये सुख असते. महिलांना आवाहन करताना किर्तनकार सोनाली दिदी करपे म्हणाल्या,घरातील प्रत्येक स्त्रीने प्रसन्न राहावे.कारण तुम्ही स्वतः लक्ष्मी स्वरूप आहात. तुम्ही अन्नपूर्णा आहात.तुम्ही रेणुका आहात. तुम्ही सरस्वती आहात. ज्या माऊलींच्या चेह-यावरती सदा प्रसन्नता आहे.ती माऊली साक्षात घरातली लक्ष्मी आहे. जन्माला कुठे यायचे हे तुमच्या माझ्या हातात नाही .आपल्याला जीवनात पैसा किती मिळणार हे ठरलेले आहे.अन्न कुठे,कधी,किती,काय खायला मिळणार हे ठरलेले आहे.जन्म कोणत्या घरात होणार हे सुद्धा ठरलेले आहे. जन्माला कुठे यायचं हे तुमच्या -माझ्या हातात नाही.हे जर तुमच्या माझ्या हातात असते तर सगळी माणसं श्रीमंतांच्या घरात जन्माला आली असती.गरिबाच्या घरात कोणी जन्माला आल़ नसतं.परमेश्वराने ही गोष्ट आपल्या हातात ठेवलेली नाही. जन्माला कुठे यायचं हे जरी तुमच्या माझ्या हातात नसले तरी जिथे जन्माला आले तिथे चांगली कर्म करून स्वतःच़े कर्तृत्व सिद्ध करणं हे तुमच्या माझ्या हातात आहे असे ह.भ.प.सोनाली दिदी करपे यांनी किर्तनात श्रोत्यांना सांगितले.

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026