• Total Visitor ( 351370 )
News photo

स्पर्धात्मक काळात शेतक-यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता - प्रदीपदादा कंद यांचे प्रतिपादन         

Raju tapal February 03, 2025 201

स्पर्धात्मक काळात शेतक-यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता - प्रदीपदादा कंद यांचे प्रतिपादन            



शिरूर :- स्पर्धात्मक काळात शेतक-यांनी वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा कंद यांनी श्री .क्षेत्र रांजणगाव गणपती येथे केले.

शिरूर अॅग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबुराव दौंडकर स्मारक समिती येथे  आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा कंद बोलत होते.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.राजेराम घावटे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकूंदराव कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे, शिरूर तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड‌.धर्मेंद्र खांडरे ,ग्राहक पंचायतीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायकवाड,जयेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.

पुणे जिल्हा बॅकेचे संचालक प्रदीपदादा कंद कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले,शेतक-यांना मार्केटचं योग्य ज्ञान असावं. कुठली पिकं कुठल्या वेळेत लावल्यानंतर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळतो आज याची गरज आहे. शेतक-यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी ही कंपनी काम करण्याचे, प्रामाणिक काम करते.शेतक-यांचा उत्पादनखर्च कमी झाला पाहिजे शेतक-यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक असा बाजार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न या सहका-यांच्या माध्यमातून होताना आम्ही सगळेजण पाहातो.पाॅलिहाऊसच्या शेतीमध्ये जाण्याची गरज आहे.आधुनिक पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याची आवश्यकता आहे.

बाबुराव दौंडकर स्मारक समिती कार्यकर्त्यांचे कौतुक करताना पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीपदादा कंद म्हणाले,शेतक-यांना आवश्यक असलेल्या त्यांच्या जोडधंद्याचं काळजी घेण्याचे प्रयत्न बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून आपण करताय याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे.शेतक-यांसाठी भरपूर योजना आहेत.त्या शेतक-यांपर्यंत पोहचत नाहीत अशी खंतही कंद यांनी यावेळी व्यक्त केली.कृषीविभागाच्या,केंद्र सरकारच्या,राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जर आपण माहिती करून घेण्याचा, त्याचं पॅम्प्लेट तयार करून ते शेतक-यांपर्यंत पोहचवलं , जनजागृती करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या फार्मर प्राॅड्युसर कंपनीला फायदा होईल.जिल्हा बॅंकेच्या शेतक-यांसाठी अनेक योजना चालू आहेत. सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आपल्याला ख-या अर्थाने गरज आहे. स्वतःला खाण्यासाठी तरी सेंद्रिय शेतीचा उपयोग करा असे आवाहनही प्रदीप दादा कंद यांनी यावेळी केले.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात अध्यक्षस्थानावरून बोलताना यावेळी  म्हणाले,शेतक-यांसाठी जे काही संस्थेच्या मनामध्ये करायचं आहे त्यासाठी जे कमीत कमी जे बांधकाम पाहिजे होते ते आता झाले आहे. प्रशिक्षणाचे मुद्दे जास्तीत जास्त तयार करता यावेत.जे तज्ज्ञ आहेत ,जे आपल्या भागातले, पश्चिम महाराष्ट्रातील जी गरज आहे ती गरज लक्षात घेवून असे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या संस्थेमार्फत करावी असा खरा मूळ उद्देश आहे.काही प्रायोगिक तत्वांवरती तालुक्यातल्या १०-१२ गावांवरती प्रयोग चालू आहेत.या कामांमध्ये आपल्यातले तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन,त्यांची मदत आज आपल्याला आवश्यक आहे .ज्यांना सहकार्य करायचे ते पण करू शकतात.या प्रकल्पाची प्राथमिक अवस्था आता सुरू झालेली आहे.हे सगळं भविष्यामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे अशी अपेक्षा विनायकराव थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

गंगा सोसायटीचे अध्यक्ष प्रा‌.राजेराम घावटे सर यावेळी बोलताना म्हणाले,विषमुक्त अन्नधान्याचा पुरवठा कसा होईल या अनुषंगाने ही अॅग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली आहे.ती अत्यंत गरजेची आहे.शेतक-यांना बघितले तर आजाराचे प्रमाण पाहिले तर या गोष्टी कशामुळे घडताहेत त्याच्यावर आपण बारकाईने विचार केला पाहिजे.तांदळासारखे स्वच्छ जीवन ,स्वच्छ आहाराने आपण जगलो तर हिंदू संस्कृतीचा चांगला उदय होवू शकतो.

शिरूर तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रदीपदादा कंद, विनायकराव थोरात,प्रा.राजेराम घावटे, संभाजीराव गवारे,सुवर्णा आदक यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड. धर्मेंद्रजी खांडरे यांनी पाहुण्यांचा शाल देवून सत्कार, सन्मान केला.

सागर फराटे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी राऊत यांनी आभार मानले.

         


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement