• Total Visitor ( 516428 )
News photo

बारावी परिक्षेचा संपूर्ण शिरूर तालुक्याचा निकाल ९२.४९ टक्के

Raju Tapal publisher May 04, 2026 39

बारावी परिक्षेचा संपूर्ण शिरूर तालुक्याचा निकाल ९२.४९ टक्के



शिरूर येथील विद्याधाम प्रशालेचा निकाल १०० टक्के



शिरूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी परिक्षेचा संपूर्ण शिरूर तालुक्याचा निकाल ९२.४९ टक्के लागला असून १२ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर  प्रशालेचा एकूण निकाल 91.53 टक्के लागला आहे. गुजर प्रशालेत कला,वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे एकूण 23. विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 216 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचे एकूण100 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 99% लागला आहे. वाणिज्य शाखेचे एकूण 81 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 92.59% लागला आहे. कला शाखेला एकूण 55 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 76.36% लागला आहे  अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांनी दिली. विज्ञान शाखा प्रथम तीन क्रमांक.

१. ढमढेरे साक्षी संदीप 68.33%

२ शिंदे अमृता अविनाश 64.00%

३ नरके भक्ती संतोष 63.00%

वाणिज्य शाखा प्रथम तीन क्रमांक 

१.ढमढेरे सार्थक सुनिल 84.83%

२.केदारी स्नेहल संतोष 81.67%

३.भोरडे सृष्टी नवनाथ 81.50%

कला शाखा प्रथम तीन क्रमांक 

१.जमधाडे अंकिता दत्ता  56.83%

२. लोखंडे अद्वैत मधुकर  55.50%

३. रासकर सोनाली दत्तात्रय 55.33 टक्के 

‌ १०० टक्के निकाल लागलेले विद्यालय पुढीलप्रमाणे:-

विद्याधाम प्रशाला शिरूर,विद्याधाम उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूरमेसाई,श्री दत्त विद्यालय पिंपरखेड,कै.आर जी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा,ज्युनिअर कॉलेज मुखई‌,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी,स्वातंत्र्य सेनानी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय हिवरे पिंपळे,कालिकामाता विद्यालय वाघाळे,श्री.गुरूदत्त विद्यालय सविंदणे,अजिंक्यतारा इंग्लिश मिडियम स्कूल शिक्रापूर,ज्ञानवर्धिनी विद्यालय ज्युनिअर काॅलेज तळेगाव ढमढेरे,न्यू व्हिजन ज्युनिअर कॉलेज शिरूर,भैरवनाथ विद्यालय कर्डे‌ या विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्या विकास मंदीर निमगाव म्हाळुंगी ७५ टक्के,श्री.मल्लिकार्जून विद्यालय न्हावरे‌ ९८.६५ टक्के, विद्यानिकेतन प्रशाला ज्युनिअर कॉलेज कोंढापुरी ८४.३३ टक्के,चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर ८५.९५ टक्के.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement