• Total Visitor ( 303257 )
News photo

मतदारांचे नाव शोधण्यासाठी,मदत कक्षाचा आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत शुभारंभ!

Raju tapal December 01, 2025 27

मतदारांचे नाव शोधण्यासाठी,मदत कक्षाचा आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत शुभारंभ!



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधणे सहज- सुलभ व्हावे यासाठी शासनाने http://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील महापालिकेच्या https://kdmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीतील NAME WISE किंवा EPIC NUMBER WISE आपले नाव शोधण्याची सुविधा कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना / मतदारांना उपलब्ध करुन दिली आहे. तथापि महापालिकेच्या नागरिकांना / मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधणे सोपे जावे याकरीता महापालिकेने महापालिकेच्या मुख्यालयातील नागरीक सुविधा केंद्रात मतदार मदत कक्ष (Help Desk) सुरू केले असून या मदत कक्षाचा शुभारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला. मतदारांच्या सुविधेसाठी अशा प्रकारचा मदत कक्ष महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरीक सुविधा केंद्रात सुरु करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभाग व  माहिती तंत्रज्ञानाचे उपायुक्त समिर भूमकर यांनी दिली आहे. या समयी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे,सिस्टम मॅनेजर प्रमोद कांबळे,निवडणूक विभागाचे अधीक्षक जयराम शिंदे व इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹1,499 पासून सुरू!
📞 संपर्क: +91 9307671912

🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL समाविष्ट

titwala-news

Advertisement

Advertisement