• Total Visitor ( 636525 )
News photo

भंडारदरा काजवा महोत्सवात पर्यटकांची लूट;दीड लाखांचे मोबाईल,लॅपटॉप लंपास

Raju Tapal publisher June 06, 2026 45

भंडारदरा काजवा महोत्सवात पर्यटकांची लूट;दीड लाखांचे मोबाईल,लॅपटॉप लंपास



अकोले :- अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ भंडारदरा येथे सुरू असलेल्या काजवा महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पर्यटकांचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरीस गेल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा परिसरात दाखल झाले आहेत. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पर्यटकांच्या वस्तूंवर डल्ला मारला. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित पर्यटकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये महागडे मोबाईल फोन तसेच लॅपटॉपचा समावेश असून,एकूण नुकसान सुमारे दीड लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून,परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. दरम्यान,काजवा महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे भंडारदरा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement