वाबळेवाडी शाळेच्या शेतकरीमित्र - अॅटोफीड या उत्पादनाचा प्रथम क्रमांक
Raju Tapal
March 10, 2023
90
वाबळेवाडी शाळेच्या शेतकरीमित्र - अॅटोफीड या उत्पादनाचा प्रथम क्रमांक
. ---------------
- आयुष साकोरे व सोहम वाबळे या विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रयोग
----------------------------
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये झालेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात ' उद्योजकतेची मानसिकता घडविण्याचा ध्यास' या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या शेतकरीमित्र - अॅटोफीड या उत्पादनाने प्रथम क्रमांक मिळविला. या उपक्रमाची निर्मिती व सादरीकरण आयुष साकोरे व सोहम वाबळे या दोन विद्यार्थ्यांनी केले होते. शिष्यवृत्ती तज्ञ गोरख काळे गुरुजी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
शेतकऱ्याची उन्हातान्हात कामातून सुटका व्हावी, खताचा अतिरिक्त वापर टाळावा, अतिरिक्त खर्च व वेळ वाचावा, खतांच्या माऱ्याने पिकांवरील पानांना इजा होऊ नये यासाठी वाबळेवाडी शाळेतील इयत्ता सहावीच्या आयुष साकोरे व सोहम वाबळे या दोन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याला शेतात खते टाकण्यासाठी शेतकरी मित्र अॅटोफीड या उत्पादनाची निर्मिती अवघ्या 180 रुपयात केली. या उपकरणाद्वारे बराचसा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात त्यांच्या या उत्पादनाचा प्रथम क्रमांक आला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी ही माहिती दिली.
पुण्यातील झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने शाळेने या गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, संदीप गिते, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, विद्या सपकाळ, तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे, संगीत शिक्षक तुषार सिनलकर, क्रीडा शिक्षक पोपट दरंदले, आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सुरेखा वाबळे, माजी उपाध्यक्ष सतीश कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट दरंदले यांनी केले.
तुषार सिनलकर यांनी स्वागत केले. आभार एकनाथ खैरे यांनी मानले.
वाबळेवाडी शाळेच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे
Share This