• Total Visitor ( 670301 )
News photo

विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी विद्यालयाची विभागस्तरीय शालेय डॉजबाॅल स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक

Raju tapal October 18, 2025 148

विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी विद्यालयाची विभागस्तरीय शालेय डॉजबाॅल स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक

          

शिक्रापूर ( प्रतिनिधी):-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद पुणे,बाफणी इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर आयोजित यावर्षीच्या पुणे विभागस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा १५ व १६ ऑक्टोबर २०२५ सोलापूर याठिकाणी पार पडल्या.त्यामध्ये विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी ता.शिरुर या विद्यालयातील १७ व १९ वयोगटाखालील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत अनुक्रमे पुणे शहर व सोलापूर संघांचा पराभव करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश केला. सलग तीन वर्षे विभाग स्तरावर प्रथम येऊन हॅटट्रिक करण्याचा आगळा वेगळा विक्रम विद्यालयातील मुलींनी आपल्या नावावर केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक मुकूंदराव ढोकले यांनी ही माहिती दिली. या विजेत्या विद्यार्थिनींना क्रिडा शिक्षिका बेबी चव्हाण व रमेश कर्पे यांनी मार्गदर्शन केले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रिडा शिक्षकांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिरुर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे व संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य रमेश जाधव,पर्यवेक्षक मुकुंद ढोकले,सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

    


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement