• Total Visitor ( 670245 )
News photo

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 

Raju tapal June 11, 2025 146

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 



त्रिनिदाद :- वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने मंगळवारी 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला. वयाच्या केवळ 29 व्या वर्षीच निकोलसने निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निकोलसने एक भावूक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.



मी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी खूप विचार केला आहे. चिंतन-मनन करुन मी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. हा खेळ ज्यावर आपण खूप प्रेम करतो, ज्याने आम्हाला खूप आनंद दिलाय आणि यापुढेही देत राहिल. कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी, वेस्ट इंडिज देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. मरुन रंगाचा ड्रेस परिधान करुन राष्ट्रगानसाठी उभे राहणे. तसेच, प्रत्येकवेळी मैदानावर उतरल्यानंतर खेळासाठी, आपल्या देशासाठी आपलं 100 टक्के योगदान देणे. माझ्यासाठी हा अनुभव काय आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणे माझ्यासाठी कायमस्वरुपी सर्वात मोठा सन्मान राहिला आहे.



पूरनने आपल्या चाहत्यांसाठीही खास संदेश आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे. आपल्या अतूट प्रेमासाठी धन्यवाद, कठिण प्रसंगी तुम्ही मला साथ दिली आणि चांगल्या प्रसंगी माझ्यासह खेळाचा आनंद साजरा केल्याचे पूरनने म्हटले. तसेच, आपले कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसाठी देखील शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रवासात माझ्यासोबत चालण्यासाठी आपले धन्यवाद. आपल्या विश्वास आणि पाठिंब्यानेच मला पुढे जाता आलं. आता, माझ्या करिअरचा हा आंतरराष्ट्रीय अध्याय आता समाप्त होत आहे. पण, वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. संघाच्या यशाव्यतिरिक्त मला काहीही नकोय, असेही निकोलसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement