वाहन शिकताना कार गेली गटारात,सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
राजू टपाल.
डोंबिवली :- एमआयडीसी निवासी,मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव जवळ काल गुरुवारी सायंकाळी साडे पाच दरम्यान मारुती सुझुकी सेलेरिओ कार हे वाहन शिकत असताना वाहनावरील नियंत्रण न राहिल्याने सदर वाहन हे रस्त्याच्या बाजूचा नविन बांधलेल्या गटारात घुसले. त्यामुळे गटाराचे आणि महावितरण खांबाच्या आधारासाठी असलेल्या स्टे केबलचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर वाहन एक युवती चालवत होती. त्या युवतीचा बाजूला बसून एक व्यक्ती तीला वाहन शिकवत असल्याचे समजले आहे. या अपघात वेळी तेथून सुदैवाने कोणी तेथून जात नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सदर कार बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन बोलवावी लागली आहे. निवासी विभागात आता सिमेंट काँक्रिट रोड झाले असल्याने व अंतर्गत रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने वाहने शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे अपघात अधूनमधून येथे होत असतात. यावर वेळीच प्रशासनाने पायबंद घालावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.