• Total Visitor ( 636553 )
News photo

नालासोपारातील युवा क्रिकेटपटू आयुष गुप्ता ला प्लेज फांउडेशन व रूचिताताई नाईक यांच्याकडून क्रिकेट साहित्याची भेट...

Raju Tapal publisher May 18, 2026 63

नालासोपारातील युवा क्रिकेटपटू आयुष गुप्ता ला प्लेज फांउडेशन व रूचिताताई नाईक यांच्याकडून क्रिकेट साहित्याची भेट...



नालासोपारा:- तालुक्यातील खेळाडूंना शालेय स्पर्धा आणि असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळात सहभाग घेण्याची संधी मिळते.मात्र,त्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.अशा कठीण परिस्थितीत खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यास ते जिल्हा आणि राज्यस्तरावर उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहतात.अशाच प्रकारे नालासोपारा समेळपाडा येथिल आयुष गुप्ता हा १२ वर्षांखालील क्रिकेट गटात सध्या नालासोपारा क्रिकेट क्लबमध्ये सराव करत आहे.क्लबचे प्रशिक्षक त्याला क्रिकेटचे मार्गदर्शन करत आहेत.आयुष ला त्याच्या सरावासाठी क्रिकेट साहित्याची आवश्यकता होती.या गरजेला प्रतिसाद देत प्लेज फांउडेशन व समाजसेविका रूचिताताई नाईक यांच्या वतिने आयुष ला क्रिकेट किट भेट दिला.सामान्य कुटुंबातील आयुष गुप्ता ला  ही भेट बहुमोल सहकार्य ठरली असून त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.क्रिकेट साहित्य किट देऊन खेळाडूला प्रोत्साहन दिल्याबद्दल कुटूंबीयांनी रूचिताताई नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले. रूचिताताई नाईक यांनी आयुष गुप्ताला  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत,तालुक्यातील युवा खेळाडू स्पर्धेत नाव उंचावतील,असा विश्वास व्यक्त केला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement