*रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचे दसरा पुजन उत्साहात संपन्न*
बदलापुर-रत्नागिरी-सिंधुदुर्ग बदलापुरकर वासियांसाठी कार्यरत असणा-या बदलापुर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचे दसरा पुजन मंडळाच्या संपर्क कार्यालयात उत्साहात संपन्न झाले. विधीवत गा-हाणे घालुन देवी देवतांच्या प्रतिमेचे पुजन करुन एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत,सुनिल दळवी,सचिव मंगेश कदम, माजी सचिव रमेश मर्गज,उपाध्यक्ष आबा बांदेकर,सदस्य दीपक वांयगणकर, सुनिल सदडेकरगुरुनाथ तिरपणकर हे उपस्थित होते. नव कार्यकारिणीस दस-याच्या शुभेच्छा व अभिनंदन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.