• Total Visitor ( 436669 )

मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून पळ काढणा-या चोरट्यास नागरिकांनी शिताफीने पकडले

Raju tapal March 17, 2026 14

मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून पळ काढणा-या चोरट्यास नागरिकांनी शिताफीने पकडले

        

शिक्रापूर:- मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून मोटरसायकलवरून‌ पळ काढणा-या चोरट्यास उरूळीकांचन नागरिकांनी शिताफीने पकडून उरूळी कांचन पोलीसांच्या ताब्यात दिले. जयश्री भरत काळे वय- ४३ रा‌.काळेवाडा उरूळी कांचन ता‌.हवेली या गृहिणीने उरूळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत फिर्याद दिली असून उरूळी कांचन पोलीसांनी बी एन एस ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जयश्री भरत काळे यांनी उरूळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार,दि.१६ मार्च २०२६ रोजी ६ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास उरूळीकांचन गावच्या हद्दीतील महात्मा गांधी विद्यालयाच्या ग्राउंड जवळ जात असताना एका मुलास त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर क्रमांक एम एच १२ एम बी ८००७ या मोटरसायकलवर माझ्या पाठीमागून येवून माझ्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी करून पळून जात असताना त्या मुलास माझे पती व लोकांच्या मदतीने पकडण्यात आले.

अडीच तोळे वजनाचे, काळे मणी असलेले त्यामध्ये वाट्या तुटलेले सोन्याचे मिनी गंठण किंमत २ लाख रुपये,एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर २२० सी सी मोटरसायकल क्रमांक एम एच १२ एम बी ८००७ अशा एकूण २ लाख ७० हजार रूपये  किंमत असलेल्या वस्तू मिळून आल्या. पोलीस सब इन्स्पेक्टर शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement