• Total Visitor ( 685471 )
News photo

२०० देशी वृक्षांच्या लागवडीने राजगुरू जयंतीला पर्यावरणाचा जागर

Raju Tapal publisher August 31, 2026 44

२०० देशी वृक्षांच्या लागवडीने राजगुरू जयंतीला पर्यावरणाचा जागर





‘रानमळा पॅटर्न’च्या माध्यमातून ‘एक विद्यार्थी,एक झाड’ उपक्रम राबविण्याचा संकल्प



प्रतिनिधी (गौतम पाटोळे)



फुलगाव:- हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती तसेच ‘रानमळा पॅटर्न’चे प्रणेते निसर्गवासी पी.टी.शिंदे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका आणि नेचर फाउंडेशन,आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चाकण-आळंदी वनपरिक्षेत्रातील माजगाव,चिंबळी (ता. खेड) येथे तब्बल २०० देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला चाकण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक,खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे,पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर,नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, वराळे सी.आय.ई. इंडिया गेअर्स डिव्हिजनचे उमेश ठाकरे,उपसरपंच राहुल चव्हाण,उद्योजक सुमित जाधव,अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अशोक येळवंडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत बोरावके,सहखजिनदार सुनील बटवाल, प्रसिद्धी प्रमुख अनिल जोगदंड,नियतक्षेत्र अधिकारी अचल गवळी,नवनाथ पगडे,वनसेवक किसन पारधी,माणिक वाळके,बाबासाहेब भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांनी मानवी जीवनातील वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची झालेली गैरसोय आणि त्यावेळी मानवाला वृक्ष व ऑक्सिजनचे जाणवलेले महत्त्व त्यांनी नमूद केले. त्यामुळे वृक्षारोपण केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता तो सातत्याने राबविला गेला पाहिजे,असे त्यांनी सांगितले. तसेच पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या ‘स्मृतीवृक्ष’ उपक्रमाची माहिती देताना प्रिय व्यक्तींच्या अस्थी नदीत विसर्जित न करता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या मुळाशी अस्थी विसर्जित करण्याचा आणि तो वृक्ष आयुष्यभर जपण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात असल्याचे देवकर यांनी सांगितले. पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत आगामी काळात तालुक्यात ‘रानमळा पॅटर्न’ अंतर्गत ‘एक विद्यार्थी, एक झाड’ ही संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आनंद झाड’ आणि ‘स्मृतीवृक्ष’ या उपक्रमांची माहिती दिली. माजी सभापती विलास कातोरे यांनी माजगाव परिसरातील वनविभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन यामुळे परिसर हिरवाईने नटला असून वन्यजीवांनाही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पी.टी. शिंदे गुरुजी यांच्या पर्यावरणविषयक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. उपसरपंच राहुल चव्हाण यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करत चिंबळी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भविष्यात वृक्षसंवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वृक्षारोपणाबाबतच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. शासनाने कर्जमाफीसारख्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रात किमान बारा वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे धोरण सक्तीने राबवावे,अशी भूमिका त्यांनी मांडली. यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होण्यास मदत होईल,असे त्यांनी सांगितले. राजगुरूंच्या जयंतीला आणि पी.टी. शिंदे गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन करत २०० देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement