स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत राजीव गांधी यांची जयंती साजरी
शिरूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशभर सद् भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रशालेचे उपशिक्षक प्रा.जी.डी. वाळके यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,प्रभारी पर्यवेक्षक रवींद्र सातपुते,प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,संचालक महेशबापू ढमढेरे,
यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.