समाजसेवक साईनाथ जाधव यांच्या जीवितास धोका
मांडा पश्चिमेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशी तसेच व्यवसायाने रिक्षा चालून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे समाजसेवक साईनाथ बारक्या जाधव यांनी कल्याण तालुका (टिटवाळा) पोलीस ठाण्यात काही अज्ञात इसमांकडून जीवितास धोका असल्याबाबत लेखी तक्रारी अर्ज केला असून एका जमिनीच्या व्यवहारा बाबत काही इसम त्यांचा काही इसमांकडून पाठलाग ही करण्यात येत असल्याचा आरोपी करण्यात आलेला आहे. त्यांचा रिक्षाचा पाठलाग एका चेहऱ्याला काळा कपडा बांधलेला व्यक्ती ह्याने त्याची दुचाकी एम एच ०५ एफ टी वरून पाठलाग केलेला आहे. तसेच साईनाथ जाधव हे आपल्या घरातून बाहेर पडल्यावर त्यांचा काही अज्ञात इसमांकडून पाठलाग ही केला जात असल्याचे त्यांचे म्हणे आहे. त्यामुळे त्यांनी मुरबाडचे उपविभागीय अधिकारी अनिल लाड यांच्याकडे ही आपला जीवितास धोका असल्याचे तक्रार अर्जात नमुद केले आहे.