शिरूरमध्ये गोळीबार; तरूणाचा मृत्यू
पुणे:- शिरूरमध्ये गोळीबाराची घटना आज सकाळी घडली असून सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबाराच्या घडलेल्या घटनेत हरी गंगावणे या तरूणाचा मृत्यू झाला. लाटेआळी,आंबेडकर नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. गणेशोत्सव काळात घडलेल्या या घटनेमुळे शिरूर शहर तसेच परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीसांनी कसून तपास सुरू केला आहे असे समजते.