डॉ.सागर भोईटे यांनी मिळवली Ph.D. पदवी
शिरूर (प्रतिनिधी):- तडवळे या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या सागर विमल अंकुशराव भोईटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत "Library & Information Science" विषयातील Ph.D. (Doctor of Philosophy) पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून यशस्वीरित्या संपादन केली.डॉ. विजय उत्तमराव बर्फे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
भोईटे यांनी "A Study of Research Publication Productivity of Faculty Members in Architecture Colleges with Special Reference to Pune Region Universities” या विषयावर संशोधन केले. वास्तुकला महाविद्यालयांमधील अध्यापकांची संशोधन व प्रकाशन उत्पादकता हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीत झाली. ५ सप्टेंबर २००७ रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने CA मामा डॉ.एम.एस.जाधव यांनी पुण्यात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अवघ्या १,७५० रूपये मासिक वेतनावर त्यांनी ग्रंथालय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.दररोज सुमारे सात किलोमीटर सायकलने प्रवास करत त्यांनी नोकरीसोबत आपले शिक्षणही सुरू ठेवले.
या प्रवासात मामा कुटुंब दौंडज समस्त जाधव व भोईटे परिवार,बंधू तळेगाव ढमढेरे नामदेव भोईटे सर यांनी मोलाची साथ दिली तसेच गुरुमित्र डॉ.योगेश डफळ यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन,त्यांच्या पाठबळामुळे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक वाटचालीसोबतच पुढील शैक्षणिक प्रवासाला दिशा मिळाली.आज भोईटे यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव असून ते MM’s Institute of Management Education, Research & Training (IMERT), पुणे येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य बी.व्ही.जाधव सरआणि महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी रामास्वामी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भोईटे यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ग्रंथालय व्यवस्थापन, संशोधनासाठी माहिती सेवा आणि शैक्षणिक दस्तऐवजीकरणाच्या क्षेत्रात योगदान दिले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची साधने उपलब्ध व्हावीत आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी आपल्या गावात सौ. विमल अंकुशराव भोईटे सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला आहे.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना भोईटे यांनी सांगितले, “ज्ञान हेच खऱ्या अर्थाने सर्वात मोठे धन आहे.आज माझ्या नावापुढे लागलेला ‘डॉ.’ हा शब्द माझ्या आई-वडिलांच्या कष्टांना,संस्कारांना आणि माझ्या आयुष्याच्या वाटचालीत साथ देणाऱ्या गुरुजनांना समर्पित आहे.